जळगांव (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२२-२०२३ च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन दिनांक १० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय, जळगांव येथे नमूद जाहिरातीच्या अंतिम दिनांकापूर्वीचे मुळ कागदपत्र व त्या कागदपत्रांचा छायांकित प्रर्तीचा एक संच व ०२ पासपोर्ट साईज फोटोसह कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२२-२०२३ च्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे १३७ रिक्त पदांसाठी शारीरीक चाचणी, लेखी परीक्षा, एनसीसी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन सामाजिक संमातर आरक्षण प्रवर्गनिहाय उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी दि. १० जुलै रोजी जळगांव जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
तात्पुरत्या निवडसूचीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळसाठी येतांना सोबत ऑनलाईन सादर केलेल्या आवेदन अर्ज प्रत, शारीरीक चाचणी ओळखपत्र/लेखी परीक्षेचे ओळखपत्र व शैक्षणिक व आवश्यक सर्व मुळ कागदपत्र सोबत आणावेत, असेही कळविण्यात आले आहे.