रावेर तालुक्यातील अजंदे येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात अजंदे येथे कुलरमध्ये पाणी टाकत असतांना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. ११ जुलै रोजी दुपारी घडली आहे. याप्रकारे रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मण संतोष पाटील (वय ३०, रा. अजंदे ता. रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. हा तरुण गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कुलर मध्ये हंड्याने पाणी भरत होता. यावेळी कुलरचा विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. (केसीएन) सदर घटनेनंतर लक्ष्मण पाटील यास नातेवाईक व ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून लक्ष्मण मयत झाल्याचे सांगितले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.
लक्ष्मणवर वेळीच उपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचले असते, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे लक्ष्मणचा मृत्यू झाल्याचा यावेळी आरोप केला होता. याबाबत जीवन बिरपन यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीया वसावे करत आहेत.









