जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रिम कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या एका १९ वर्षीय युवकाने बुधवारी रात्री घरात कोणीही नसताना, गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय ओंकार गोपाळ (वय १९, सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. विजय एमआयडीसी भागातील एका कंपनीत वॉचमनचे काम करायचा.(केसीएन) विजय हा मुळ जामनेर तालुक्यातील पिंप्री येथील रहिवाशी होता. कामानिमित्त काही महिन्यांपासून सुप्रिम कॉलनीत रहायला आला होता. बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसताना, गळफास घेतला. हा प्रकार चुलत बहिणीच्या लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविले.
पोलिसांनी विजयला शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषीत केले. विजयच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.(केसीएन)या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे हे करत आहेत.