रावेर पोलीस स्टेशनची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : शहरातून बऱ्हाणपूर रस्त्यावरून सार्वजनिक जागी एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनने संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत
बंडू प्रभाकर महाजन (वय ४५, रा. तामसवाडी ता. रावेर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनला शुक्रवारी दिनांक ५ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रामपेठ परिसरातून संशयित आरोपी जितेंद्र नारायण सोनवणे (वय ३२) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने चोरीस गेलेल्या रावेर आणि फैजपूर पोलीस स्टेशनच्या घडलेल्या गुन्ह्यातील अंतर्गत ९ दुचाकी काढून दिले आहेत.
सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर एसपी अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकातील नाईक सुरेश मेढे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने केली आहे.









