नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात तिथे भारताने लिपुलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. यावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. आता नेपाळ लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित करणार आहे. तसेच कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी दिला आहे.

नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली म्हणाले कि, आम्ही चर्चेमधून त्या प्रदेशावर आपलाच हक्क असल्याचे सांगण्याचे सर्व प्रयत्न करणार आहोत. जर यामुळे कोणालाही राग आला तरी आम्हाला त्याची काळजी नाही. त्या प्रदेशावर कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा हक्क दाखवू. तसेच भारतासोबत मैत्री अधिक दृढ करायची असेल तर ऐतिहासिक गैरसमज त्यापूर्वी दूर झाले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.







