जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती : विद्यार्थ्यांची पायी दिंडी
जळगाव (प्रतिनिधी) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी दि. ४ जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात यावल प्रकल्पांतर्गत असलेल्या १७ शासकीय आश्रम शाळा, शासकीय वस्तीगृह तसेच ३२ अनुदानित आश्रम शाळांनी सहभाग नोंदवला. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून गावात वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली तसेच आश्रमशाळेमधील प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्यास एका झाडांचे पालकत्व देण्यांत आले असुन, प्रत्येक झाड जगावे यासाठी ठिंबक सिंचन द्वारे पाणी देण्यांसाठी नियोजन आहे.
उद्घाटन समारंभ सकाळी ९ वाजता शासकीय आश्रम शाळा, डोंगर कठोरा ता. यावल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले. उपवनसंरक्षक जमीर शेख, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार नाझीरकर यावेळी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील बारा वन विभागाच्या रोपवाटिकेमधून ११०९१ रोपांचा मोफत पुरवठा करण्यात आला. सर्व आश्रम शाळांमध्ये एकाच दिवशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आश्रम शाळांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी यावल प्रकल्प अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पवन पाटील व सहाय्यक प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभाग प्रकल्प कार्यालय यावल आर एम लोवणे यांनी केले.