धरणगाव शहरातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील जैन गल्लीत राहणाऱ्या दुकानदाराच्या घराच्या दुसऱ्या मजल्यातून प्रवेश करून चोरटयांनी घरातून सोन्याचे दागिने आणि ४५ हजारांची रोकड असा एकुण १ लाख १७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी दि. २ जुलै रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर गुलाबदास जैन (वय ५५ रा. जैन गल्ली, धरणगाव) हे पुजा साहित्याचे दुकान चालवून ते परिवाराचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी दि. १ जुलै रोजी रात्री ते जेवण करून झोपले हेाते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजातून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने आणि ४५ हजारांची रोकड असा एकुण १ लाख १७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी दि. २ जुलै रोजी पहाटे ५ वाजता समोर आली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय जिभाऊ पाटील हे करीत आहे.