अमळनेर ;- अमळनेर पोलीस स्टेशन येथील कार्यरत असलेले पोलीस शिपाई योगेश महाजन यांना कोरोनाचा पार्श्वभूमीवर उत्तम कामगिरी बजावली म्हणून डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल चे मिशन देवदूत अंतर्गत आभार चे पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी फोन द्वारे पोलिस कॉन्स्टेबल योगेश महाजन यांचे आभार मानले.
कोरोनाच्या संकटात पोलीस हे दिवसरात्र जनतेसाठी कार्यरत आहेत.त्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश महाजन यांनी कोरोना सारख्या महामारीत सामोरे जाऊन लोकांमध्ये ज जागृती केली, त्यांना या आजाराची माहिती दिली व शारीरिक अंतर पाळून हा संसर्गजन्य रोग बरा होऊ शकतो हे पटवून दिले, या आजाराच्या आणीबाणी च्या संकटात देश सेवा करीत असल्याने त्यांच्या या कार्याला डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे देवदूत सन्मान देऊन योगेश महाजन यांना डिजिटल आभार पत्र पाठविले आहे. कोरोना संकट दूर झाल्यावर नासिक येथे कलाम कुटुंबियांचे उपस्थित त्यांचा सत्कार केला जाणार आहे.