भागलपूर ;- बिहारमधील भागलपुर येथे झालेल्या एका भीषण अपघातात नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मजुरांनी भरलेला ट्रक आणि बसमध्ये हा दुर्देवी अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळावर तात्काळ दाखल जाले. जखमींना उपचारासाठी जवळील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावर उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून मजुरांना घेऊन जात होते. त्यावेळी ट्रक आणि बसची धडक झाली. त्यानंतर ट्रक पलटी झाला आणि दरीत कोसळला. घटनास्थळावरच नऊ जणांचा मृत्यू झाला.