• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“ईडी”कडे तक्रार आलीय, तुम्हाला अटक होणार…लवकर पैसे भरा…!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2024
in Uncategorized, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“ईडी”कडे तक्रार आलीय, तुम्हाला अटक होणार…लवकर पैसे भरा…!

भुसावळच्या अभियंत्याला खोट्या बतावण्या करून १५ लाखांत ऑनलाईन गंडविले

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ येथील एका अभियंत्याला अज्ञात सायबर भामट्यांनी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टिळक नगर पोलीस स्टेशन मधून बोलत असल्याचे सांगून तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रारी दाखल झाले आहेत, तुम्हाला अटक होईल अशी भीती घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार दि. २७ जून रोजी दुपारी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्याबाबत हा प्रकार घडला आहे. त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून बुधवारी दि. २६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल असे सांगण्यात आले.(केसीएन) फिर्यादीने कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रारी दाखल झाले आहेत असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांना दुसरा फोन आला. पलीकडील व्यक्तीने टिळक नगर पोलीस स्टेशन मधील पोलीस इन्स्पेक्टर विनायक बाबर बोलत असल्याचे सांगितले.

तुमच्याविरुद्ध टिळक नगर पोलीस स्टेशन मुंबई येथे तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर फिर्यादीला विविध कागदपत्रे मागण्यात आले. फिर्यादीने कागदपत्रे पाठवल्यानंतर त्यांना खरे वाटावे म्हणून संशयित आरोपींनी त्यांना इडी ऑफिसचे बनावट पत्र पाठविले.(केसीएन)तसेच वरिष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत कॉन्फरन्स मध्ये घेण्याची बतावणी करीत सांगितले की, तुमच्याविरुद्ध ईडी कार्यालयात तक्रार नोंद झाली आहे.तुमच्या नावाचे पकड वॉरंट असून हा प्रकार थांबवायचा असेल तर तुम्हाला तर काहीतरी रक्कम भरावी लागेल. अशा शब्दात पलीकडील संशयित आरोपीने फिर्यादीला दम भरला.

त्यानंतर विनायक बाबर नामक व्यक्तीने त्याचे बंधन बँकेचे खाते क्रमांक पाठविले. नंतर दुपारी साडेबारा वाजता फोन करून सांगितले की, आत्ताच बँकेत जाऊन पैसे भरा. नाहीतर तुम्हाला अटक होईल. त्यानुसार फिर्यादीने भीतीपोटी त्याच्या कॉसमॉस बँकेच्या खात्यातून विनायक बाबर नामक व्यक्तीच्या बंधन बँकेच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये आरटीजीएसमार्फत भरले.(केसीएन)मात्र नंतर फिर्यादी प्रचंड घाबरला होता. त्याने त्याच्या परिवाराला, मित्रांना सांगितले असता त्यांनी तुमची कोणीतरी फसवणूक करत असल्याचे सांगून सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्यास सांगितले.नंतर दि. २७ जून रोजी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे अभियंत्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal#crimefraud
Previous Post

मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील बसफेऱ्या नियमित सुरू करा

Next Post

महानगरपालिकेच्या आयुक्तांसह लिपिकाने मागितली ८ लाखांची लाच, दोघे फरार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महानगरपालिकेच्या आयुक्तांसह लिपिकाने मागितली ८ लाखांची लाच, दोघे फरार !

महानगरपालिकेच्या आयुक्तांसह लिपिकाने मागितली ८ लाखांची लाच, दोघे फरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
धक्कादायक, शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार
1xbet russia

खळबळ : १२ वर्षीय शाळकरी मुलीवर शेतात नेऊन अत्याचार !

March 5, 2026
आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू
1xbet russia

आव्हाणे येथील तरुणाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon