जळगांव (प्रतिनिधी );- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज २६ जून रोजी मतदान होत असून जिल्ह्यातील १३ हजार शिक्षक मतदार २० केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यात १३ हजार १२२ शिक्षक मतदार असून त्यात ९ हजार ६७३ पुरुष तर ३ हजार ४४९ स्त्री मतदार आहे. मतदानासाठी १२० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक केंद्रासाठी केंद्राध्यक्ष, 5. कर्मचारी, सुक्ष्म निरीक्षक, एक शिपाई, तसेच बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. म
जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात १, यावल तालुक्यात १, रावेर १, मुक्ताईनगर १, बोदवड १, भुसावळ २, जळगांव तालुक्यात ३, धरणगांव १, अमळनेर २, पारोळा १, एरंडोल १, भडगांव तालुक्यात १, चाळीसगांव तालुक्यात २, पाचोरा तालुक्यात १, जामनेर तालुक्यात १ असे एकूण २० मतदान केंद्र आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण २० मतदान केंद्र आहे. या प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असून १३७ अंमलदार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मतदान केंद्राच्या आवारात १०० मीटर अंतरावर एकूण २० पोलिस अधिकारी, प्रत्येकी तीन या प्रमाणे ६० पुरुष अंमलदार, २० महिला अंमलदार तैनात राहणार आहे. मतपेटी वाटप ठिकाणी एक पोलिस अधिकारी, १० पुरुष अंमलदार व दोन महिला अंमलदार तैनात राहणार आहेत. मतपेट्या नाशिक येथे नेण्यासाठी एक पोलिस अधिकारी, तीन अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे एकूण २२ पोलिस अधिकारी, ९३ पुरुष अंमलदार, २२ महिला अंमलदारांचा बंदोबस्त या निवडणुकीसाठी राहणार आहे.