पहुर. ता.जामनेर-येथील जामनेर रस्त्यावर सोनाळा फाट्याजवळ सिलिंडर ने भरलेला ट्रक उलटल्याची घटना आज पहाटे४.३०वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने जिवित हानी झाली नाही.
मनमाड येथून इंंडेन कंपनीच्या ३०६गँस सिलिंडर भरून येणारा ट्रक क्रमांक एम.एच४१-ए.जी.७०००हा वाशीम जिल्ह्यातील मालेगांव येथे जात असतांंना पहुर पासून ५कि.मी.अतंरावर सोनाळा फाट्याजवळ समोरून येणारे कंटेनर अंगावर आल्याने ट्रक चालकाने वाचवण्यासाठी ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने घेतल्याने मुरुमामुळे रस्त्याच्या कडेला उलटला. ट्रक ज्या ठिकाणी उलटला तेथून मेन लाईन चा इलेक्ट्रिक खांब आहे जर खाबांवर हा ट्रक धडकला असता तर शाँट सर्किट होउन सिलिंडर चा स्फोट होऊन जिवित हानी झाली असती सुदैवाने ही दुर्घटना टळली. ट्रक मध्ये चालकासह क्लिनर होते. दोघांना किरकोळ दुखापत झाली. पहुर पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतरही उशीरा पर्यंत ते पोहोचले नव्हते असे समजते.