एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मलिक नगरातील एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्या पॅन्टच्या खिशातून १२ हजार रुपये चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास लावून एका अल्पवयीन मुलासह तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
अल्ताफ फकीरा पटेल (रा. मलिक नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली होती. दि. २८ एप्रिल रोजी ते घरात झोपलेले असताना त्यांच्या घरात मागील खोलीत त्यांच्या खिशातून अज्ञात व्यक्तीने १२ हजार रुपये काढून सोडून दिले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहिती काढली. त्यानुसार सराईत गुन्हेगार मोबीन खान मुलतानी याने चोरी केल्याची खात्री झाली. मात्र तो बाहेरगावी निघून गेल्याने त्याचा शोध सुरू होता. दोन दिवसापूर्वी तो मास्टर कॉलनी परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
त्याने सदरची चोरी ही अल्पवयीन बालकासमवेत केली असल्याचे दिसून आले आहे. या अल्पवयीन बालकाला देखील ताब्यात घेऊन बालसुधारगृह येथे दाखल करण्यात आले आहे. मोबीन खान याच्याकडून पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, योगेश बारी, किरण पाटील, नाना तायडे, चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.