पुणे (वृत्तसंस्था) – नारायणगाव, अवकाळी पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला पिकांची तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
माजी खासदार आढळराव पाटील यांनी 14 मे रोजी गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या जुन्नर तालुक्यातील परिस्थितीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, करोनाच्या महाभयंकर परिस्थितीत शेतकरी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन शेतीमाल पिकवत आहेत. त्यातच स्थलांतरणामुळे शेतमजुरांची संख्याही कमालीची घटली आहे.







