जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ. किशोर इंगोले यांनी ध्वजारोहण करीत ध्वजाला वंदना दिली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचा आज दि. १० जून रोजी २६ वा वर्धापनदिन होता. त्यानिमित्त जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. इंगोले यांनी विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त माहिती दिली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ.प्रविण लोहार, डॉ.रमेश वासनिक, डॉ.गिरीष ठाकरे, डॉ.राजकुमार सुर्यवंशी, डॉ.राजेश जांभूळकर, डॉ.दिपक शेजवळ या विभागप्रमुखांसह महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.