जळगावातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील भाजप तथा जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात एका तरूणाच्या खिश्यातून २७ हजारांची रोकडची चोरी करणाऱ्या खिसेकापूला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घनश्याम चुडामण पाटील (वय ४० रा. खडके खुर्द ता. एरंडोल) हे मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी ५ वाजता जळगाव शहरातील जी.एम. फाऊंडेशन येथे आलेले होते. त्यांवेळी संशयित आरोपी नुरा अजगर कादर शेख (वय ३० रा. गौसिया नगर, भुसावळ) याने घनश्याम पाटील यांच्या खिश्यातून २७ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर घनश्याम पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून सायंकाळी ५ वाजता तक्रार दिली.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी नुरा अजगर कादर शेख यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी संशयित आरोपी नुरा अजगर कादर शेख याला अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर सिराज तडवी हे करीत आहे.