गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या कम्युनिटी हेल्थ व फंडामेंटल हेल्थ नर्सिंग विभागातर्फे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शिक्षकांसाठी करण्यात आले..
दि. ३ रोजी सकाळी ९ ते १२ वा. हे प्रशिक्षण शिबिर गोदावरी स्कुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात ४२ (शिक्षक) सहभागी झाले होते. सुरुवात प्रा. स्वाती गाडेगोणे यांनी प्रास्ताविकात प्रथमोपचाराचे महत्व विषद केले.प्रा.शुभांगी गायकवाड आणि प्रा.पूनम तोडकर यांनी प्रथमोपचार आणि आपत्कालीन व्यवस्थापन (सीपीआर) याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रथमोपचारासंबंधी आणि आपत्कालीन व्यवस्थापन (सीपीआर) प्रात्यक्षिकही करुन दाखविले. प्रा.जॉय जाधव यांच्या आभार प्रदर्शनाने सत्राची सांगता झाली. जळगावच्या गोदावरी सीबीएसई स्कुल जळगावच्या मुख्याध्यापिका निलीमा चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र सर्व सहभागींसाठी माहितीपूर्ण शैक्षणिक आणि प्रेरणादायी होते. यावेळी प्रा.स्वाती गाडेगोणे, प्रा. शुभांगी गायकवाड, प्रा. पूनम तोडकर, प्रा. जॉय जाधव, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगावच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी तसेच प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.