विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार व सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणी) पी. के. सिंग यांच्या नेतृत्वात विविध स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात दि. ३० व ३१ मे रोजी १,२८५ प्रवाशांकडून सात लाख सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शिवाय धूम्रपान करणाऱ्या १२१ प्रवाशांना ३९ हजार २५० रुपयांचा दंड ठोठावला. असा एकूण एक हजार ४७२ प्रकरणांतून सात लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १५ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.