भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या खूनप्रकरणी विविध समाजातील महिलांनी रविवारी बैठक घेतली. बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. यात बुधवारी दि. ५ जून रोजी भुसावळ शहरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
भुसावळ शहरात मोहन बारसे सभागृहात विविध समाजातील महिलांची रविवारी बैठक झाली. बैठकीत हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला. बैठकीत महिला वर्गाने विविध निर्णय घेतले. यात बुधवारी दि. ५ जून रोजी भुसावळ शहरात भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चात विविध मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या जाणार आहेत. याशिवाय संशयित आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, संशयित आरोपींना भुसावळ शहराबाहेर काढले पाहिजे आणि संशयित आरोपींची घरे तोडून टाकली पाहिजे अशी मागणी यावेळी महिलांनी माध्यमांशी बोलताना केली.