जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावी छत्रपती संभाजींनगर येथे ६० व्या वाढदिवसानिमित्त बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्टेशनदरम्यान रस्त्यांच्या डिव्हायडरमध्ये पिंपळ, बकुळ, चिंच, अर्जुन, काटेसावरी, जांभूळ, पेरू, लिंब अशी विविध प्रकारची ६५ झाडे लावण्यात आली. यामध्ये गायकवाड परिवार आणि सहकारी यांनी सहभाग घेतला. ‘वुई फॉर इन्व्हायरोन्मेन्ट’ या ग्रुप तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी डॉ. विजय गायकवाड, त्याच्या पत्नी डॉ. अनिता गायकवाड, मुलगा मिहीर, भाऊ महेंद्र गायकवाड, वहिनी वर्षा गायकवाड, पुतण्या तन्वी गायकवाड, सानिका गायकवाड, काकू विमलबाई गायकवाड, महेंद्र, स्मिता, क्षितीज पताडे, शौर्य पताडे, डॉ. रोहिणी, संजय काचोळे, सुरेश तोडकर, वैशाली तोडकर,
दुष्यंत आठवले, डॉ. आनंद व निना निकाळजे आदी उपस्थित होते. ‘वूई फोर एनव्होंरर्मेन्ट’ या संस्थेचे कमल पहाडे यांच्यातर्फे सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रासह देशाचे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे झाडे लावण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी किंवा इतर प्रसंगात झाडे लावण्याचा उपक्रम राबविला तर तापमानवाढ कमी होऊन समस्त मानवजातीला दिलासा मिळणार असल्याचा संदेश डॉ. गायकवाड यांनी दिला आहे.