ग्रामस्थांनी घेतली विस्तार अधिकाऱ्यांची भेट
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नांद्रा हवेली येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून दि. २७ मे रोजी पंचायत समिती, जामनेर येथे गावातील ग्रामस्थ यांनी विस्तार अधिकारी यांना घेराव घातला होता. ग्रामसेवकाचा मनमानी कारभाराचा पाढा विस्तार अधिकारी यांच्यासमोर मांडला. गावातील ग्रामस्थांच्या मजूर शेततळे हे कागदपत्रांवर तीन महिन्यांपासून सह्या करण्यास वारंवार टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी आज पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी यांची भेट घेतली.
सलग तीन महिन्यांपासून कागदपत्रांवर सह्या करण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करून मनमानी कारभार करत आहे परंतु गावातील नागरिक ग्रामसेवकाला कंटाळून आज अखेर तक्रार घेऊन पंचायत समिती येथे आले. सर्व हकीकत विस्तार अधिकारी यांना सांगितली. त्वरित विस्तार अधिकारी यांनी ग्रामसेवक यांना बोलाऊन घेतले व यावर सह्या का होत नाही याचा जाब विचारला. तर ग्रामसेवकांनी उडवा उडविचे उत्तरे दिले .ताबडतोब ग्रामसेवक यांना सह्या करण्यास विस्तार अधिकारी यांनी सांगितले. ग्रामसेवकाची संबंधित अधिकारी यांनी लवकरात लवकर नांद्रा हवेली येथून उचलबांगडी करावी अशी गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.
याचप्रमाणे देऊळगाव गुजरीला असतांना सुद्धा नागरिकांच्या तक्रारी असत. तिथेही या ग्रामसेवकाचा सतत निष्काळजीपणा ग्रामस्थांना दिसुन येत होता. तसेच घाणीचे साम्राज्य, गावात ठिकठिकाणी सांडपाण्याचे तळे साचलेले आहेत. यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर ग्रामसेवक,यांचे गावातील विकास कांमाकडे लक्ष न देण्याचे चित्र बघायला मिळत आहे.