पाचोरा ;- तालुक्यातील एकूण 20 कोरोना बधितांपैकी केवळ चार व भडगाव तालुक्यातील सहा असे एकूण 10 बाधित रुग्ण कोविड केअर सेन्टर मध्ये उपचार घेत आहेत . यातील 3 जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. मात्र मागील सुमारे आठवडाभरा पासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही. आता केवळ 40 एवढेच अहवाल येणे बाकी आहेत. यामुळे पाचोरा तालुक्याची ग्रीन झोन कडे वाटचाल सुरू झाली असून आगामी 4 दिवसात पाचोरा तालूका कोरोनामुक्त होऊ शकतो.
रुग्णांच्या डिस्चार्ज प्रसंगी आमदार किशोर पाटील यांचेकडून रुग्णांना मिठाई वाटप करण्यात आली यावेळी
डॉ. अमित साळुंखे डॉ समाधान वाघ, डॉ यशवंत रवींद्र पाटील ( होमिओपॅथिक तज्ञ) ,डॉ स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे आदी उपस्थित होते. दरम्यान तालूकाग्रीन झोन कडे वाटचाल करण्यात होमिओपॅथीक उपचार पद्धतीचा मोलाचा वाटा आहे.असे नागरिकांतून बोलले जात आहे व डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांकडून प्रतिक्रिया येत आहेत.







