भाजपाची खेळी झाली यशस्वी
जळगाव (प्रतिनिधी) : आ. एकनाथराव खडसे यांनी अखेर रविवारी दि. १२ मे रोजी यापुढे कुठलीच निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आहे. हीच घोषणा भाजपसाठी महत्वाची होती. भाजपची हि खेळी यशस्वी झाली आहे. आता एकनाथराव खडसे यांना भाजप प्रवेशाची दारे उघडी होणार असल्याची माहिती मिळाली असून भाजप श्रेष्ठी हे ४ जूननंतर निर्णय घेणार आहे. तसेच राजकीय सन्यास घेणार नाही असेहि खडसेंनी सांगितले आहे. यामुळे त्यांचे राज्यपालपदी पुनर्वसन होण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.
एकनाथराव खडसे यांनी भाजपमध्ये असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाप्रकरणी भारतीय जनता पक्षावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोप प्रत्यारोप केले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहीले गेली ३ वर्षे त्यांनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासह भाजप नेत्यांवर टीका केली होती. आता मात्र त्यांनी भाजपमधील काही मित्रांच्या सांगण्यावरून घरवापसी करीत असल्याचे सांगितले. मात्र सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाने त्यांना अद्यापि प्रवेश दिलेला नाही. प्रवेशासाठी दार न उघडण्याचे गुपित काय याची चर्चा सुरु असताना मात्र आता एकनाथरावांनी रविवारी यापुढे कुठलीच निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली आहे. हे विधान आ चंद्रकांत पाटील यानी सुनबाई रक्षा खडसे यांना मदत करावी म्हणून तर केले असावे असी ही चर्चा आता रंगतआहे.दुसरीकडे त्यांच्या भाजप पक्षप्रवेश न होण्यामागचे गुपित काहीप्रमाणात उलगडले आहे.
एकनाथराव जर निवडणूक लढणार नाहीत तर गिरीश महाजन यांना आता रस्ता मोकळा झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात महाजनांची पकड मोठी आहे. आता खडसेंच्या भाजपाला येण्यामुळे भाजपचे मार्ग सुकर झाले आहे. जळगाव पूर्व भागात विरोधकांचा फारसा जोर राहिलेला नाही. त्यामुळे आता खडसेंच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेनंतर त्यांचा भाजपत प्रवेश निश्चित मानला जातो आहे. मात्र त्यांनी राजकीय सन्यास घेणार नाही असेही सांगितले आहे. त्यामुळे खडसेंवर भाजप श्रेष्ठी कोणती जबाबदारी देतात ते पाहण्यासारखे राहणार आहे.