जळगाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024…
जळगाव (प्रतिनिधी ) – भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जळगाव लोकसभाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ आज नशिराबाद शहरातील रॅलीत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थिती लावून भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला.
यावेळी जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री.जळकेकर महाराज, श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या कन्या भैरवीताई वाघ, माजी जि.प.उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, प्रभाकर आप्पा, मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदभाऊ रोटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवराज पाटील,शिवसेना तालुका युवा सेना अध्यक्ष अजय महाजन, सौ.माधुरीताई अत्तरदे, वैशालीताई पाटील, मिलिंद भाऊ चौधरी, भाजपा तालुका समन्वयक जळगाव जितेंद्र पाटील, शिवसेना शहर प्रमुख चेतन बराटे,अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, आनंद रंधे आणि महायुतीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.