मुंबई (वृत्तसंस्था) – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसतेय. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देश देखील सज्ज झालाय. वांद्रे येथे १००८ बेडचे पहिले खुले रुग्णालय उपचारासाठी सज्ज झाले आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन आणि आरोग्य तपासणीची सुविधा देखील आहे.
हे देशातील पहिले खुले रुग्णालय आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता वांद्रे येथील बीकेसीमध्ये एमआयडीसी मैदानावर हे खुले रुग्णालय तयार करण्यात आले आहे. एकूण १००८ बेड बनवले असून प्रत्येक बेडच्या शेजारी ऑक्सिजन मशिन ठेवण्यात आली आहे.
मुंबईत सध्या काही सरकारी आणि काही खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन सेंटर देखील बनवण्यात आले आहेत. मुंबईत सध्याच्या घडीला ७५०० बेड्सची व्यवस्था आहे. पण इथे दुसऱ्या आजाराचे रुग्ण देखील आहेत.कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून हे रुग्णालय कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.