जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा गावात राहणाऱ्या तरूणाच्या घरातून ३६ हजार रूपये किंमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना दि. २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २५ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात विजय राजेंद्र सोनार (वय २४) हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. शिक्षणासह व्यवसाय करून तो उदरनिर्वाह करतो. दि. २० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्याने घर उघडे असल्याचे पाहून खोलीतून सुमारे ३६ हजार रूपये किंमतीचे तीन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय सोनार याने गुरूवारी दि. २५ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे हे करीत आहे.