पाचोरा बसस्थानक येथील प्रकार
पाचोरा (प्रतिनिधी) : येथील बसस्थानक परिसरातून एका तरुणीच्या पर्समधून ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली. याप्रकारणी सोमवारी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवीना सागर पाटील (वय-२१, रा. श्रीकृष्ण गल्ली, पहूर पेठ ता.जामनेर) या परिवारासह वास्तव्याला असून कामाच्या निमित्ताने त्या २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पाचोरा बसस्थानक येथे आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. त्यांनी सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.