संजय सावंत, उन्मेष पाटील, करण पवार पुढे, शिवसेवेनं वैद्यकीय कक्षाच्या वतीने मदतीचे आश्वासन
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी कंपनीतील डी-सेक्टर मधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागून २० जणांहून अधिक कामगार गंभीररित्या जखमी झाले होते . यातील जखमी कामगारांची मनोविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. हि घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही कामगार कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही उबाठा गटाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांनी दिली.
यावेळी उबाठा गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, कृउबा माजी सभापती लकी टेलर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव शहरातील एमआयडीसी सेक्टर मधील मोरया ग्लोबल केमिकल कंपनीत आज बुधवारी दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता कंपनीत केमिकल कंपनीत भीषण आग लागून यातील तीन ते चार कामगारांची प्रकृती गंभीर आहे. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे . उबाठा गटाचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांच्यासह महाविकास अगडीच्या पदाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालयात या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जखमींना पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन करण पवार, संजय सावंत, उन्मेष पाटील यांनी यावेळी दिले.