चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात आधार कार्ड अपडेट होत नसल्यामुळे आधारच निराधार झाल्याचा अनुभव ग्रामिण भागातील जनतेला येत आहे. याचा फटका शालेय विदयार्थ्यांना सर्वात जास्त बसत असल्याचे पालकांतर्फे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील व राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे अपडेट होत नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विदयार्थ्यांना अनेक शैक्षणिक फॉर्म भरतांना अडथळा निर्माण होत आहे.
वारंवार आपले आधार नूतनीकरण केल्यावर सुद्धा त्यांचे नूतनीकरण यु.आई डी.ए आई. कडून त्यांचे आधार अपडेट हे रद्द होत नसून विद्यार्थ्यांचे आधार कार्डाशी जुळलेले अनेक कामे तसेच शैक्षणिक फॉर्म हे भरले जात नसल्याचा अनुभव येत आहे . त्यामुळे यासाठी विदयार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही आधार कार्ड बोट व अंगठ्यांचे ठसे व्यवस्थित येत नसल्यामुळे अपडेट होत नाही. मात्र ज्यांचे बोटाचे तसेच अंगठ्याचे ठसे व्यवस्थित आहे त्यांचे सुद्धा आधार नूतनीकरण हे रद्द करण्यात येत आहे.
बरेच शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड हे अनिवार्य असते. ज्यामध्ये आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईलवरती ओ.टी.पी द्वारे पुढील शैक्षणिक कामे पुढे वाढतात. मात्र विद्यार्थ्यांचा आधारच नूतनीकरण होत नाही तर मोबाईल नंबर त्यामध्ये कसा जोडला जाईल हे प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थी, पालक हे वारंवार आधार केंद्राच्या फेऱ्या मारताना दिसत आहे. रावेर तालुक्यातील अनेक विद्यार्थी ज्यांचे वय १५ ते २० वर्ष आहे त्यांचे आधार नूतनीकरण मध्ये जास्त समस्या येत आहे.अनेक विद्यार्थी, पालक आधार मुख्य विभागीय कार्यालय मुंबई तसेच ठाणे या ठिकाणाहून सुद्धा धाव घेतली. माञ त्या ठिकाणाहून त्यांचे आधार नूतनीकरण झालेले नसून ही नेमकी कोणती तांत्रिक समस्या आहे जे मुख्य कार्यालयात जाऊन सुद्धा निकाली लागत नाही याची चौकशी यू.आई डी.ए आई.ने करणे गरजेचे असल्याचेही सामान्य नागरिक व विद्यार्थी पालक यांचे म्हणणे आहे.
काय आहे आधार नूतनीकरणाचे नियम
जर एखाद्या व्यक्तीने त्याचं आधार अपडेट केलं तसेच तो प्रलंबित असला तर त्याला साठ ते नव्वद दिवस आधार अपडेट व्हायची प्रतीक्षा करावी लागते. त्या आधी जर आधार अपडेट नाही झाले तर त्याला परत आधारला अपडेट करावा लागतो. मात्र नूतनीकरण केलेल्या आधार जर अपडेट झाला नसला तसेच तुम्ही नियमानुसार दिलेल्या दिवसांच्या आताच पुन्हा अपडेट केला तर मागील केलेला आधार नूतनीकरण व नंतर केलेला नूतनीकरण हे दोघे यू. आई डी.ए आई.डी कडून रद्द करण्यात येते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आधार मुख्य कार्यालयात नूतनीकरणाच्या तक्रारीचा ढीग, मात्र निवारण नाहीच
अनेक विद्यार्थी, पालक आपले आधार नूतनीकरणाची समस्या घेउन आधारच्या मुख्य विभागीय कार्यालयात गेले असता त्या ठिकाणी त्यांची फक्त तक्रार नोंदवली जाते. नंतर त्यांना एक महिन्याच्या आत तुमचे आधार अपडेट होईल असे सांगण्यात येते. तरी सुद्धा आधार अपडेट होत नसल्याने विद्यार्थी पालकाच्या हिश्यात निराशा हीच येते. काही समस्या येत असल्यावर ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करून आपली तक्रार नोंदवून यू.आई डी.ए आई.कडून आपली समस्या सोडवली जाणार असल्याची खात्री आता विद्यार्थ्यांच्या मनात राहिलेली दिसून येत नाही .ही नेमकी कसली तांत्रिक समस्या आहे जी सोडवली जाताच नाही, यु.आई डी.ए आई. च्या सिस्टम मध्ये शासनाचे सुधारणा करावी अशी एकमुखी मागणी आता सामान्य नागरिक तसेच विदयार्थी, पालक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.