भुसावळात ६५ जण कोरोना निगेटिव्ह
जळगाव ;- शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाच्या रुग्नांची संख्या वाढतच असून आज सकाळी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जळगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे भुसावळात ६५ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा देणारी बाब आहे. जळगावातील रुग्णांमध्ये जोशी पेठेतील एक महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 237 इतकी झाली आहे.दरम्यान फिजिकल डिस्टंसिंग न पाळल्याने रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे . त्याचे पालन होण्याची आवश्यकता आहे .
भुसावळात ६५ जण कोरोना निगेटिव्ह
भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 65 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या अहवालात जाम मोहल्ला रहिवासी व नगरपालिका कर्मचारी यांचा समावेश आहे.