शहतील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत स्वामी राजेंद्र पोतदार (वय ३१) हा तरुण राहायला असून तो सुवर्ण कारागीर आहे. दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे दीपक भोई व युवराज भोई यांनी काहीही एक कारण नसतांना स्वामी पोतदार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दीपक याने त्याच्याजवळील चॉपरने तर युवराज याने काचेची बाटली स्वामी व त्याच्या भावाच्या डोक्यावर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या आईला देखील मारहाण केली. त्यांनी लागलीच शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई (दोघ रा. शिवशंकर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे हे करीत आहे.