नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे असंही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं.
ANI
✔
@ANI
Government to immediately create a Rs 1 lakh crore Agri-Infrastructure Fund for farm gate infrastructure for farmers:
FM Nirmala Sitharaman
View image on Twitter
२४३
४:२१ म.उ. – १५ मे, २०२०
Twitter
शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. दोन महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात ७४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ५६० लाख लीटर दुधाचं संकलन करण्यात आलं. देशातल्या २ कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचंही स्पष्ट करण्यात आलं
शेती आणि कृषी उद्योगासाठी महत्त्वाची घोषणा करणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. सगळ्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी काम करत असतात असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन यासाठीही घोषणा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज ११ घोषणा करण्यात येतील ज्यापैकी ८ कृषी क्षेत्राशी संबंधित असतील असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. यात कोणत्या क्षेत्राला काय मिळालं याच्या घोषणा तीन दिवस करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेचा आजचा तिसरा दिवस आहे.