भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील श्रीराम नगर येथे काम करण्याबाबत बोलल्याच्या कारणावरून तरूणाला सहा जणांनी लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अशोक पाटील ( वय-२९) रा. श्रीराम नगर, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. काम करण्याबाबत बोलल्याच्या कारणावरून विशाल पाटील याला रविवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता शरद पाटील, मनोज राखुंडे, गोलू सोनार, अमोल पुरण, जितू (पुर्ण नाव माहित नाही) आणि अनोळखी व्यक्ती असे एकुण ६ जणांना लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या घटनेत विशाल पाटील हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश चौधरी हे करीत आहे.