जळगाव ;- २३ मार्च पासून लॉक डाऊन झाल्यापासून सगळ्यात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा जळगाव शहरातील मृत्यू झाला व त्याचे दफन विधी करण्यात आले त्यानंतर कोविड हॉस्पिटलमधून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चोपडा,धरणगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयास्पद मृत्यू झालेल्यांचा दफन विधी जळगाव शहरातील इदगाह कब्रस्तान ट्रस्टच्या कब्रस्थान मध्ये करण्यात आलेले आहे . आतापर्यंत १४ ते १५ मृतदेहाचे दफनविधी कब्रस्थान जळगाव येथे करण्यात आलेले आहे. दफनविधीसाठी सात बाय पाच फुटाचा खड्डा खोदुन त्याच्यात मृतदेह ठेवून त्यावर लाकडी आवरण ठेवावे लागते व नंतर त्यावर माती टाकावी लागते तत्पूर्वी जनाचे नमाज अदा केली जाते.
या सर्व कार्यासाठी कब्रस्थान ट्रस्ट तर्फे शब्बीर पटेल यांची नेमणूक करण्यात आली असून त्याला मासिक पगार व मानधन दिले जाते प. रंतु कोविड मृतदेहाची दफनविधीसाठी ट्रस्टला सामाजिक कार्यकर्ते इसाक बागवान तसेच ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह हे अक्षरशः जीव धोक्यात घालून मदत करीत आहे.इसहाक बागवान हे तर आमच्या हिन्दू बाधवाचे सुद्धा अंतिम विधि पार पाडीत आहे
जनाजा नमाज मुफ़्ती अतिकउर रहमान पार पाडीत आहे अशा या तिन्ही लोकांना शासनाने सुरक्षा कवच द्यावे त्यात इन्शुरन्स व मानधन त्यासोबत पी पी ई कीट चा समावेश असावा अशी मागणी इदगाह ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे.
भुसावळ येथील एकाच दिवशी तीन मृतदेह दफनविधी झाल्यावर या तिन्ही व्यक्तींचा प्रमाणपत्र देऊन शहर ए काज़ी मुफ़्ती अतीकुर्रहमान व ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी त्यांचा सत्कार केला.








