• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर पहाटे काळाचा घाला : ट्रक-क्रुज़र् धडकेत ३ ठार, ४ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2024
in अपघात, जळगाव
0
शिवलिंग घेण्यासाठी गेलेल्या भक्तांवर पहाटे काळाचा घाला : ट्रक-क्रुज़र् धडकेत ३ ठार, ४ जखमी

जळगावच्या खोटे नगर परिसरात शोककळा

धरणगाव तालुक्यातील बांभोरी बसस्टॉपवरील भीषण घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ बकावा येथे प्राणप्रतिष्ठाकरिता शिवलिंग घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या क्रूझर कारला वाळूच्या भरधावं ट्रकने धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना शुक्रवारी दि. १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली. जळगावातून घरापासून निघून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या बांभोरीजवळ हा अपघात झाला आहे.

विजय हिम्मत चौधरी (वय् ४०, साई नगर), तुषार वासुदेव जाधव (वय् २८, रा. खोटे नगर) व भूषण सुभाष खंबायत (३५, रा.साई नगर ) यांचा मृत झालेल्यांत समावेश आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून, या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवारी दि. १५ मार्च रोजी सकाळी साडे सहा वाजता क्रुझर गाडीने ओंकारेश्वरला निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने क्रुझरला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

अशी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी

घटनेत मयत झालेला भूषण खंबायत याचे साईनगर येथे समृद्धी प्रोव्हिजन आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. तर विजय चौधरी हे शेरी ता. धरणगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत माध्यमिक शिक्षक असून त्यांच्या पश्चात आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. तुषार जाधव हा ड्रायव्हर असून मागच्या वर्षी त्याचे लग्न झाले होते. त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान मयत झालेल्या सर्वांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकाच आक्रोश केला होता.


 

 

Previous Post

भाजपा वापरणार पुन्हा धक्कातंत्र,  भविष्यात उमेदवारी बदलण्याची चिन्हे !

Next Post

खुनाच्या गुन्हयातील फरार संशयित तीन वर्षानंतर अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खुनाच्या गुन्हयातील फरार संशयित तीन वर्षानंतर अटक

खुनाच्या गुन्हयातील फरार संशयित तीन वर्षानंतर अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon