• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 14, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया यशस्वी खरगोनच्या तरूणावर अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी उपचार

जळगाव (प्रतिनिधी) :- खरगोन जिल्ह्यातील ममनाला येथील २५ वर्षीय तरूणावर टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी ठरली. अवघ्या १५ दिवसात हा तरूण पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला आणि चालूही लागला आहे.

याबाबत माहिती अशी की, मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील ममनाला येथील जुबेर निर्भान (वय २५) हा तरूण पलंगावरून कोसळला. या घटनेनंतर त्याला चालणे देखिल शक्य होत नव्हते. त्याच्या कुटूंबियांनी त्याला इंदोर येथे वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती केले. त्याठिकाणी सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासणी करण्यात आली. या तपासणी अंती त्याच्या खुब्यातील दोन्ही बाजूचे बॉल हे तुटल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत त्याच्या रक्ततपासण्या केल्या असता त्याच्या क्रीएटीनचा स्तर हा देखिल वाढला होता. त्यावरून त्याला किडनी विकार असल्याचेही निदान झाले. किडनी विकार असतांना शस्त्रक्रिया करणे मोठे अवघड काम होते. अशा परिस्थितीत जुबेरचे अमळनेर येथील मामा सईद तेली यांनी त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात आणण्याचा सल्ला दिला. त्यानुसार जुबेर निर्भान यास त्याच्या कुटूंबियांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी आणले.

अस्थिरोग तज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया
जुबेर यास रूग्णालयात आणल्यानंतर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक अग्रवाल यांनी त्याची तपासणी केली. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या क्रीएटीनचा स्तर कमी करणे गरजेचे होते. त्यानुसार पुर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट पाहून त्याच्या क्रिएटीनचा स्तर कमी करण्यासाठी त्याला मेडीसीन तज्ञांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात भरती करण्यात आली. त्याच्यावर मेडीसीन तज्ञ डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेत्वी वैद्य यांनी डायलेसीस करून क्रिएटीनचा स्तर कमी केला. त्यानंतर जुबेर याच्यावर डॉ. दीपक अग्रवाल यांनी टोटल हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करून दोन्ही बाजुच्या खुब्यातील बॉल नव्याने टाकण्यात आले. अवघ्या १५ दिवसात जुबेर हा पुर्वीप्रमाणे त्याच्या पायावर उभा राहिला आणि चालूही लागला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. चाणक्य, डॉ. प्रसाद बांबरसे यांनी सहकार्य केले.

 या शस्त्रक्रियेसाठी अस्थिरोग विभाग, मेडीसीन विभाग आणि डायलेसीस विभाग या तिघांचे अथक प्रयत्न जुबेरसाठी फलदायी ठरले. आयुषमान भारत योजनेत ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. अशा पध्दतीच्या अवघड आणि किचकट स्वरूपाच्या शस्त्रक्रियांसाठी सहाय्य ठरणारे विविध विभाग हे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात एकाच छताखाली असल्याने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. या शस्त्रक्रियेमुळे आता जुबेर हा त्याच्या पायावर पुन्हा उभा  राहिल्याचे समाधान आहे.

– डॉ. दीपक अग्रवाल,
अस्थिरोग विभागप्रमुख,डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunavar-astirogtanya-upchar/
Previous Post

हद्दपार गुन्हेगाराला अटक, एलसीबीची कामगिरी

Next Post

भाजपा वापरणार पुन्हा धक्कातंत्र,  भविष्यात उमेदवारी बदलण्याची चिन्हे !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजपा वापरणार पुन्हा धक्कातंत्र,  भविष्यात उमेदवारी बदलण्याची चिन्हे !

भाजपा वापरणार पुन्हा धक्कातंत्र,  भविष्यात उमेदवारी बदलण्याची चिन्हे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!