पोलीस स्टेशनला नोंद
पारोळा (प्रतिनिधी) :- शहरातील दिल्ली दरवाजा भागातील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील दिल्ली दरवाजा भागातील रहिवासी नम्रता भास्कर फासगे (वय १६) या तरूणीने रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. नम्रता पारोळा येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. सध्या ती परीक्षा देत होती. या युवतीने घरातील लोखंडी रॉडला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
दरम्यान परिसरात ही घटना कळताच तिला खाली उतरवून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका निरमुळे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.