जळगाव ;- सध्या कोरोनाची महामारी पसरली असून लोकडाऊनमुळे रिक्षाचालकांचे व्यवसाय बंद आहेत . राज्यात १५ लाख तर जिल्ह्यात २० ते २५ हजार रिक्षाचालक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना १० हजारांची आर्थिक मदत आणि कर्जाच्या हफ्त्यांमध्ये सवलत देऊन व्याज माफ करावे . तसेच ऑटोरिक्षाचालकांच्या कुटुंबियांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . निवेदनावर उपाध्यक्ष प्रमोद वाणी , सल्लागार नईम खाटीक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .
जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांना आश्वासन दिले . यावेळी उपाध्यक्ष प्रमोद वाणी सल्लागार नईम खाटीक सुनिल जाधव संघटन सचिव दिपक सोनवणे अनिल सोनवणे. विठ्ठल ठाकूर. सलिम शेख. अनिल सपकाळे. सलील शेख ताराचंद पाटील. जनार्दन भारंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.