जामनेर तहसीलदारांचा दणका
जळगाव (प्रतिनिधी) :- अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुध्द दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु सदर वाहनाचे मालक यांनी दंडाची रक्कम अदयाप पावेतो शासन जमा केली नाही. त्यामुळे कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दि. ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, जामनेर येथे जप्त करण्यात आलेला वाहनाचा लिलाव आयोजित करण्यात येत आहे.
सदर लिलावात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपावतो तहसिल कार्यालय, जामनेर येथे संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार, जामनेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विक्रीस असलेल्या वाहनाचे वर्णन
* वाहन मालकाचे नाव – शिवाजी प्रभाकर पाटील, वाहन क्रमांक – जे.सी.बी.चेसीसनं. 1814936 M2011 , वाहन प्रकार – जे.सी.बी , हातची किंमत – 15,65,200/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 15,65,200/-.
* वाहन मालकाचे नाव – शिवाजी प्रभाकर पाटील, (सदाशिव मोहन रोकडे) वाहन क्रमांक – ट्रॅक्टर क्र. MH 19 CU 4372, वाहन प्रकार – ट्रॅक्टर हातची किंमत – 15,65,200/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 15,65,200/-
* वाहन मालकाचे नाव – भुषण जगन्नाथ वाघ – वाहन क्रमांक –MH 19 Z3015, वाहन प्रकार – डंपर , हातची किंमत – 3,22,655/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,68,655/-
* वाहन मालकाचे नाव – राजेंद्र देवगिर गोसावी – वाहन क्रमांक – इंजिन क्र. JBHZ430403, वाहन प्रकार – डंपर , हातची किंमत – 12,85,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,68,660/-
* वाहन मालकाचे नाव – भरतसिंग विठ्ठलसिंग परदेशी (गणेश भरत परदेशी), वाहन क्रमांक – ट्रॅक्टर क्र. MH 19 CZ 6983 व विना क्रमांकाची ट्रॉली, वाहन प्रकार – ट्रॅक्टर व ट्रॉली, हातची किंमत – 4,61,500/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 1,22,885/-, सदरचे वाहन कोठे आहे. जुने तहसिल कार्यालय जामनेर,
* वाहन मालक – विनोद उर्फ बंडु विश्वास पाटील ( विष्णु लक्ष्मण काळे ) – वाहन क्रमांक – डंपर क्र. MH 20DE 3204, वाहन प्रकार – डंपर, हातची किंमत – 10,80,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,91,545/-
* ज्ञानेश्वर दिनकर बावस्कर- वाहन क्रमांक – ट्रक क्र. MH 41G5321, वाहन प्रकार – ट्रक – हातची किंमत – 7,25,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,45,780/-
* वाहन मालक – अरुण पंढरीनाथ नन्नवरे- वाहन क्रमांक – आयशर क्र. MH 18AA8240, वाहन प्रकार – आयशर – हातची किंमत – 4,05,000/-, प्रलंबित दंडाची रक्कम – 2,45,780/-