जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना महेंद्र पाटील नामक इसमाने दिलेल्या धमकी व शिवीगाळ प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीतर्फे मंगळवारी दि. २० फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नरेंद्र ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज टोके, डॉ. अनुज पाटील, डॉ. जितेंद्र विसपुते, डॉ. गौरव महाजन, डॉ. चेतन पाटील, आरोग्यदूत पै. शिवाजी पाटील, सोपान महाजन आदी उपस्थित होते.