पुणे ( प्रतिनिधी) :- शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र.व एक पाऊल आरोग्य समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने ! या उपक्रमाचे उद्घाटन देशाचे लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाविषयी माहिती देणारी कार्यशाळा व भव्य मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार डॅाक्टर सेलद्वारे करण्यात आले. यावेळी आमदार रोहीत पवार यांच्याबरोबर संपूर्ण युवा संघर्ष यात्रेमध्ये पायी चालत सहभागी झालेल्या संघर्ष यात्रींचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या समस्या व मागण्यांबाबतचे निवेदन सादर केले.
कार्यक्रमास रोहीत पवार, विकास लवांडे (राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते), प्रशांत जगताप (शहराध्यक्ष, पुणे), डॉ. सुनील जगताप (डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र), तुषार कामठे, प्रकाश म्हस्के, जयदेव गायकवाड, पंकज बोराडे, रवी वरपे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) डॉक्टर सेलचे डॉ.सुनील जगताप (प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र), डॉ.नितीन पाटील (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष,डॉ.धैर्यशील पवार (मराठवाडा विभागीय अध्यक्ष), डॉ शिवदीप उंद्रे (पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष), डॉ.विजय जाधव (विदर्भ विभागीय अध्यक्ष), डॉ. संतोष खंबाळकर (कोकण विभागीय अध्यक्ष), सतिश कांबळे (प्रदेश रुग्ण सहाय्यक प्रमुख), डॉ. शशिकांत कदम (अध्यक्ष, पुणे शहर), डॉ. राहूल सूर्यवंशी (राज्य समन्वयक), डॉ. सुनील होनराव, डॅा. हेमंत तुसे, डॅा. राजश्री पोखरना, डॅा. कवीता ढमाले, डॅा. अनुपमा गायकवाड व डॉ.सेलचे महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे राज्यभरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावना वाचनाने करण्यात आली. डॉ. सेलच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आणि विविध पातळ्यांवरील मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या कामांचा थोडक्यात आढावा छोट्या ध्वनीचित्रफितीद्वारे घेण्यात आला. डॉ. सुनील जगताप यांनी ”शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र” हा उपक्रम सुरू करण्यामागची परिस्थिती व भूमिका स्पष्ट केली. सध्या ज्या काही शासकीय योजना आहेत, त्या तळागाळातील, गरजू लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. त्या लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचाव्यात म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांमध्ये डॉक्टरांशिवाय इतर कार्यकर्तेदेखील आरोग्य मित्र म्हणून सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
तसेच महिलांमधील योनीमार्गाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता, त्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट द्वारे निर्माण केली जाणारी लस जर आपण उपलब्ध करून देऊ शकलो, तर ती गोरगरीब मुलींना मोफत देऊन कर्करोगाचा प्रतिबंध केला जाऊ शकतो, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. या उपक्रमाचे समन्वयक सतिश कांबळे यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णसहायक समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सद्यस्थितीकडे लक्ष वेधत आपण एकत्र येऊन दडपशाहीविरूद्ध संघर्षाची गरज अधोरेखित केली. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार’ डॉक्टर सेलच्या कामाची दखल घेत, पुढील कामासाठी प्रोत्साहन दिले.