चुंचाळे ता.यावल ;- सध्या देशभर कोराना या जिवघेण्या व्हाँयरसच्या विषाणूने हैदोस घातला असून त्यामुळे साऱ्याचे नियोजन कोलमडलेआहे . लाँकडाऊन आणी संचारबंदीमुळे सार्वजनिक उत्सव बंदी घातलेली आहे . या बंदीमुळे काहिना आपले विवाह लाबणीवर टाकले असले तरी बंहूतांश जण सरकारने दिलेल्या आदेशा नुसार घरगुती पद्धतीने विवाह सोहळा उरकुन घेण्यावर भर देत आहेत . आश्याच पद्धतीने चुंचाळे ता.यावल येथे आज १४ मे रोजी अत्यंत साध्या पद्धतीने घरातच विवाह सोहळा पार पडला . माणीक नारायण पाटील( राजपूत ) यांचे पुत्र नरसिंग व नंदीचे खेडगाव ता.पाचोरा येथील कृष्णा नरसिंग पाटील यांची सुकन्या वैष्णवी हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. यावेळी केवळ वधु व वराचे आई वडील मामा ब्राम्हण अशा मोजक्या लोकांची उपस्थिती होती . यावेळी फिजीकल डिस्टीनसिंगचे पालन करुन मास्क चा वापर करण्यात आला होता या आदर्श विवाहाचे चुंचाळेसह सर्वत्र कौतुक होत आहे.