• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2024
in खान्देश, जळगाव
0
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’


नॅशनल एज्युकेशन शिक्षण प्रणालीवर आधारीत खेळ, मनोरंजनातून हडप्पा संस्कृतीचे दर्शन

जळगाव ( प्रतिनिधी ) – अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला असून उद्या दि. ९ ला संध्याकाळी ४.३० ला उद्घाटन होईल. उद्घाटक म्हणून डॉ. इंद्राणी मिश्रा असतील. सोबत जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतूल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन उपस्थितीत असतील. ९, १०, ११ फेब्रुवारी असे तीन दिवस खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४.३० ते ८.३० वाजेदरम्यान मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. हडप्पा संस्कृतीचे ऐतिहासिक दर्शन हे एड्युफेअरचे आकर्षण असेल.
‘खेळता खेळता शिका व शिकता शिकता खेळा’ ह्या संकल्पनेवर आधारित एड्युफेअरमध्ये १४ झोन असून ८० पेक्षा जास्त खेळ अनुभवता येतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे चार वयोगटानुसार खेळांची विभागणी केली आहे. यामध्ये भाषिक कौशल्याला चालना देणाऱ्या इंग्रजी, हिंदी, मराठी मध्ये अनेक खेळ आहेत. चांद्रयान-३ च्या यशस्वीतेवर विज्ञान झोन, नासा, रशियाच्या स्पेस कार्यावर अनेक वर्किंग मॉडेल असतील, यातून प्रत्यक्ष इस्रो मध्ये असल्याची अनुभूती होईल. गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती व सृजनशिलतेला चालना देणारे कोडींग मॉडेल उभारले आहे.
मनोरंजनात्मक एड्युफेअर..
मनोरंजनातून विज्ञान, गणित, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, नृत्यकलेचा आविष्कार पाहता येणार आहे. यात पपेट शो, नृत्य, संगीत, तबला, लाठी-काठी नृत्य, बासरी, चार्ली चैपलिन यासह विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने बनविलेल्या हस्तकलेच्या २००० पेक्षा जास्त वस्तूंचे प्रदर्शन बघता येईल. अॅडव्हेंचर गेम झोनमध्ये जे पारंपारिक खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असे विटी दांडू, तीन प्रकारची मांडोळी, गोट्या, लाकडी व प्लास्टिक भवरा, लगोरी, पावसाळ्यातील चिखलात खेळला जाणारा खुपसनी या खेळासोबतच हॉकी, ड्रॉफ्ट द बॉल, बिन बॅग, जिम बॉ थ्रो रिंग टॉस असे शारीरिक व्यायामासोबतच आनंद देणारी खेळसुद्धा एड्युफेअर मध्ये खेळता येतील.
चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्ली…
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांनी व्यावसायाभिमूख शिक्षणप्रणालीवर आधारित शिक्षणव्यवस्था तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला असते, त्या कलागुणांना हेरून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी या एड्यूफेअरचे आयोजन मोठ्याभाऊंच्या प्रेरणेतून करण्यात आले आहे. यात चटकदार व्हॅली स्पाईस खाऊ गल्लीत पालकांसोबत विद्यार्थ्यांचे विविध खाद्यपदार्थांचे स्वत:चे स्टॉल असतील यावर ताव मारण्याची संधी जळगावकरांना उपलब्ध करून दिली आहे.
सिंधू संस्कृतीचे दर्शन..
एड्युफेअरचे मुख्य आकर्षण असलेले सिंधू संस्कृतीचे दर्शन होणार आहे. अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: सिंधू संस्कृतीची नगररचना केली. हडप्पा संस्कृतीची नगररचना आणि स्थापत्य, घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, धान्याची कोठारे आदी हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पनांचे २०० च्या वर मॉडेल विद्यार्थ्यांनी साकार केले आहे. आतापर्यंत फक्त पुस्तकामध्ये हडप्पा संस्कृती वाचली असेल मात्र प्रत्यक्ष पाहण्याची संधी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सृजनशीलतेला चालना देणारे भन्नाट कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगावकरांनी एड्युफेअरमध्ये यावे, असे आवाहन अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे. यातील काही निवडक खेळ सशुल्क असतील.


 

 

Tags: #anubhuti english midium school #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/anubhuti-englishmidiuam-school/
Previous Post

धक्कादायक, भरदिवसा जळगावात मुख्य चौकात निघाले पिस्तूल !

Next Post

मध्य रेल्वेकडून “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत ९५८ मुलांची सुटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती – मुंबई अनारक्षित विशेष गाडी चालवणार

मध्य रेल्वेकडून "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत ९५८ मुलांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon