नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय आहे.रिपब्लिकन खासदारांनी मंगळवारी असा कायदा आणण्याचा प्रस्ताव दिलाय. ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनवर बंदी घालण्याची ताकद मिळू शकेल.तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांच्यानंतर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनीही चीनवर निशाणा साधलाय.. चीनने गेल्या 20 वर्षांत जगाला 5 मोठी संकटे दिली आहेत. या संकटांमध्ये सार्स, एव्हिएन फ्लू, स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरस या चार व्हायरसची चीनमधूनच उत्पत्ती झाली. कोरोना व्हायरस चीनमधील वुहान शहरातून जगभर पसरला आहे. याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. असंही रॉबर्ट ओ ब्रायन म्हणालेत.