बोदवड : शहरांमध्ये भर दिवसा पथदिवे सुरू असल्यामुळे बोदवडच्या जनतेला आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे थर्डआय फाउंडेशनने भर दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद करण्याचे नियोजन करावे यासाठी नुकतेच मुख्याधिकारी भोसले यांना निवेदन दिले आहे.
बोदवड शहरामध्ये कमीत कमी एक हजार खांब जरी आपण धरले.तरी एक हजार खांबावरती एक हजार बल्ब रोज भर दिवसा सुरू असतात.त्यामुळे तीन रुपये युनिट प्रमाणे जर आपण हिशोब लावला तर महिन्याचे ९० हजार रुपये खर्च होतात आणि वर्षाचे दहा लाख ८० हजार हा जो खर्च आहे तो काही नगरपंचायत स्वत:च्या खिशातून करत नाही ते आपल्याकडून जनतेकडून वीज पट्टी म्हणून कर वसूल करतात त्यामुळे भर दिवसा सुरू असलेले पथदिवे जर बंद करण्याचे नियोजन केले तर जनतेला जो होणारा आर्थिक फटका बसतो नुकसान भरू शकतो आणि शासनाला याचा फायदा होऊ शकतो पण विज तयार करण्यासाठी जितकी मेहनत घ्यावी लागते ती मेहनत पण वाचेल आणि विनासायास होणारा खर्च वाचेल त्यामुळे बोदवड नगरपंचायत चे मुख्य अधिकारी यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी बोदवड येथील थर्डआय फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक झाबक, सचिव नंदलाल पठे, बोदवड येथील पत्रकार राजेश बोदडे, वासुदेव साखरे,नितीन पाटील आदी मान्यवरांनी मागणी केलेली आहे.