जळगाव (प्रतिनिधी) :- भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत येथील केंद्रीय विद्यालयामध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. जळगाव जिल्ह्यातील सर्व केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सीबीएसई शाळा आणि राज्य शासनाच्या शाळा अशा एकूण १२ शाळांमधील पात्र असलेले एकूण १०० विद्यार्थी यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला होता.
स्पर्धेसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ , ‘चंद्रयान’ ‘खेळातील भारताचे योगदान’ आणि ‘विकसित भारत’ असे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते. स्पर्धेसाठी केंद्रीय विद्यालय, जळगाव ही नोडल शाळा म्हणून निवडण्यात आलेली होती. या स्पर्धेसाठी केंद्रीय विद्यालयातील प्राचार्य सोना कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती सोज्वळ, संतोष पाटील, मीनाक्षी राजेश पाटील, विद्या हिवराळे, एकनाथ सातव यासोबत अनेक शिक्षकांनी स्पर्धेसाठी परिश्रम घेतले.