जामनेर (प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री मोदी जी यांच्या संकल्पनेतून १४ ते २२ जानेवारी दरम्यान देशभरातील नागरिकांना देशातील छोटे-मोठे मंदिर व तीर्थस्थळ स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दिं. १७ जानेवारी रोजी श्री क्षेत्र आमखेडा देवी ता. जामनेर येथे प्रभारी सीईओ तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. लोखंडे यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
स्वच्छता मोहीमेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. लोखंडे, जे. के. चव्हाण, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, नवल, राजमल भागवत, तुकाराम निकम, युवराज पाटील, अशोक पालवे, संजय बैरागी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत मनोज पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.