• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रायजेमिनल न्युराल्जिया आजारावरील शस्त्रक्रियेने ४१ वर्षीय महिलेचा पुर्नजन्म  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
ट्रायजेमिनल न्युराल्जिया आजारावरील शस्त्रक्रियेने ४१ वर्षीय महिलेचा पुर्नजन्म  

न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी केली दुर्मिळ अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
 
जळगाव  (प्रतिनिधी ):-   ट्रायजेमिनल न्युराल्जिया म्हणजे चेहर्‍यावर अचानक आणि तीव्र वेदना जाणवणे, जे काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकू शकते. हा विकार चेहर्‍याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना होऊ शकतो. या अशाच दुर्मिळ आजाराच्या ४१ वर्षीय महिला रूग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी अनुभवाच्या जोरावर ही अतिजोखमीची मायक्रोव्हॅस्कुलर डीकंप्रेशनची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेमुळे सदर महिला ही ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजारातुन पुर्णत: बरी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बर्‍हाणपूर येथील सुलतानाबी शेख ह्या महिलेच्या चेहर्‍याच्या एका बाजूस प्रचंड वेदना होत होत्या. पाणी पितांना, जेवतांना देखिल त्यांना ह्या वेदना होत होत्या. ह्या वेदना इतक्या असह्य असतात की, अशा आजारात रूग्णाच्या मनात वारंवार आत्महत्येचा विचार येतो. त्यामुळे प्रचलित भाषेत याआजाराला सुसाईडल डिसीज असेही म्हटले जाते. या आजारात रक्तवाहिनीचे ठोके हे संवेदना जागृत करणार्‍या नसेला बसू लागल्यानंतर प्रचंड वेदना होतात.  बर्‍हाणपूर येथील सुलताना बी शेख यांनी दाढीचे दुखणे असेल म्हणून स्थानिक ठिकाणी दाढ काढल्या. मात्र तरी देखिल त्यांचे दुखणे वाढतच होते. त्यामुळे त्यांनी उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालय गाठले. याठिकाणी प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी रूग्णाने सांगितलेल्या वर्णनानुसारच आजाराचे निदान केले. त्यानंतर सुलताना बी शेख यांची एमआरआय तपासणी करून रक्तवाहिनी आणि संवेदना जागृत करणार्‍या नसेची परिस्थिती लक्षात घेत डॉ. अनंत चोपडे यांनी  मायक्रोव्हॅस्कुलर डीकंप्रेशन ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ह्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च लागतो. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध असलेल्या पंतप्रधान आयुषमान योजनेचा लाभ सदर महिलेला मिळवून देण्यात आला असून संपूर्ण शस्त्रक्रिया ही मोफत झाली आहे.
मायक्रोस्कोपीकद्वारे झाली शस्त्रक्रिया
सुलताना बी शेख या महिला रूग्णावर मायक्रोव्हॅस्कुलर डीकंप्रेशनची शस्त्रक्रिया  करण्यात आली. या तंत्रानुसार मेंदूला बारीक छिद्रे पाडून चिकटलेली रक्तवाहिनीची नस आणि संवेदना जागृत करणारी नस ही वेगळी करण्यात आली. अतिजोखमीची असलेली ही शस्त्रक्रिया कौशल्य पणाला लावत आणि अनुभवाच्या जोरावर न्युरोसर्जन डॉ. अनंत चोपडे यांनी यशस्वी केली. दुसर्‍या दिवशी महिला रूग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होऊन रूग्ण या आजारापासून पुर्णत: बरी झाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. गजानन गवई आणि टीमचे सहकाय लाभले.

ट्रायजेमिनल न्युराल्जिया हा अत्यंत दुर्मिळ आजार आणि तितकाच तो गंभीर स्वरूपाचा आहे. लक्षणे आणि वर्णनाद्वारे या आजाराचे निदान होते. तसेच हा आजार बॉलीवुडमधील एका प्रसिध्द अभिनेत्यालाही झाला होता. पुर्वीच्या काळी शस्त्रक्रिया होत नसल्याने अनेक रूग्णांनी वेदना असह्य झाल्याने आत्महत्या देखिल केल्या आहेत. त्यामुळेच याला सुसाईडल डिसीज असेही म्हटले जाते. या आजारासाठी आवश्यक असलेली ही शस्त्रक्रिया ही अतिजोखमीची असते. शस्त्रक्रियेवेळी थोडे जरा दुर्लक्ष झाले तरी रूग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा शस्त्रक्रियांसाठी अनुभव हा खूप महत्वाची भूमिका निभावतो. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ट्रायजेमिनल न्युराल्जिया या आजाराची ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समाधान आहे.

– डॉ. अनंत चोपडे, न्युरोसर्जन, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, जळगाव.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/trayjeminal-nuraljiya-aajavaril
Previous Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीतर्फे विश्‍व हिंदी दिन उत्साहात

Next Post

उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा -आ. किशोर पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा -आ. किशोर पाटील

उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा -आ. किशोर पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
1xbet russia

तोंडापूर येथे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

September 11, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातर्फे केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा
1xbet russia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ९ वी १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

September 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

September 11, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

“पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास”

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon