रावेर ( प्रतिनिधी) – लोकसभा क्षेत्रात खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाथ फाऊंडेशन (जळगाव )च्या वतीने दोन हजार गरींब व स्थलांतरीत मजुरांना अन्नाचे पॉकीट वाटप करण्यात आले. या मजुरांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक अन्नाच्या पॉकीटासोबत सैनेटायझर बाटली व मास्कदेखील वाटप करण्यात आले.
यावेळी नाथ फाऊंडेशन चे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, दिलीप माहेश्वरी, डॉ. अभिषेक ठाकुर, पृथ्वीराज सोणवने, धीरज काबरा, योगेश लाडवंजारी, सचिन पाटील यांच्यासह नाथ फाऊंडेशनचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात मजुरांच्या उपजिवीकेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव शहरातील व परप्रांतीय स्थलांतरीत मजुरांची भुक भागविण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिड महिन्यापासुन मेहनत घेत आहेत. आतापर्यंत या अन्नदानाच्या उपक्रमातून शहरातील गरीब व परप्रांतीय मजुरांकरांना पावणेे दोन लाख अन्नाच्या पॉकीटांचे वाटप करण्यात आले आहे.
: फोटो कैप्शन –
नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, सुनिल माळी, डॉ. अभिषेक ठाकुर, दिलीप माहेश्वरी व इतर







