जळगाव (प्रतिनिधी ) – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.दिव्यांग जनजागृती रॅलीची सुरवात जी.एस.ग्राऊंड येथून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र, इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस जळगांव संचलित उत्कर्ष मतिमंद विद्यालय, प्रौढ मतिमंद मुलांची संरक्षित कार्यशाळा, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर (सावखेडे बु), अपंग सेवा मंडळ संचलित मुकबधीर विद्यालय नवी पेठ जळगांव शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी वर्ग तसेच जळगांव शहरांतील दिव्यांग व्यक्ती, संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांचे हस्ते जनजागृती रॅलीचे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्राचे अधीक्षक वांझट, उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगावचे मुख्याध्यापक संजय बोरसे, श्रवण विकास मंदिर मुख्याध्यापिका ज्योती खानोरे, मूकबधिर विद्यालय नवी पेठ शिक्षिका शेख आदी उपस्थित होते.